आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:डॉ. दाभोळकरांच्या स्मृतिदिनी अंबाजोगाईत निर्भय मॉर्निंग वाॅक

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुणे येथे मॉर्निंग वॉक करताना मागून डोक्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचेही याच पद्धतीने खून करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून दर महिन्याच्या २० तारखेस निर्भय मॉर्निंग वॉक काढला जातो.

अंबाजोगाईत शनिवारी निर्भय मॉर्निंग वाॅकचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सव्वासहा वाजता मॉर्निंग वॉकची सुरुवात आंबेडकर चौक येथून झाली. बस स्टँड - सावरकर चौक मार्गे शिवाजी चौक येथे या मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला. ‘फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर’ अशा घोषणा आणि ‘हम होंगे कामयाब’ या सामुहिक गीतगायनाने या मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला. या मॉर्निंग वॉकमधे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंबाजोगाई चे सर्व सदस्य आणि सर्व समविचारी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते . सहभागी सर्व नागरिक व कार्यकर्त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंबाजोगाईचे कार्याध्यक्ष गणेश कदम व प्रधान सचिव कृष्णा आघाव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांकडून आभार मानण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...