आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:‘नीट’मधील गुणवंतांचा डाॅ. तिडकेंच्या हस्ते गौरव ; वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेेत घवघवीत यश

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब होतकरू आणि ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना अल्पदरात शिक्षणाचे धडे देण्याचे काम करणाऱ्या तिडके क्लासेसच्या वतीने वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेेत (नीट) घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संचालक डॉ.शिवाजी तिडके व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

डॉ.तिडके क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी नीट परीक्षेत यश प्रापत केले. यावर्षी एमबीबीएससाठी पात्र ठरलेले विठ्ठल अवघड -५९३, संतोष यादव-५७७, सचिन राठोड-५६९, ज्ञानेश्वर निर्मळ -५५८, अजय टेकमोगे- ५३९, संतोष डांबे -५३१, विश्वास तिडके -५२८, सुदाम बांगर-५१२ हे विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा तिडके क्लासेसच्या वतीने डॉ.तिडके यांनी सत्कार केला. यासह पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यासोबतच ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शिक्षणात मदत करणारे म्हणून डॉ.तिडके यांची ओळख असून, याही वर्षी नीट परीक्षेत यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तिडके क्लासेसच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच परिपाक यंदाच्या निकालातील गुणवत्तेतून दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...