आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:विद्यापीठाच्या वाणिज्य शाखा अभ्यास‎ मंडळावर डॉ. ज्ञानेश्वर येवले यांची निवड‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर शिरूर‎ येथील कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयाचे वाणिज्य शाखा विभाग प्रमुख प्रा.‎ डॉ.ज्ञानेश्वर येवले यांची निवड झाली. डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या‎ अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड,‎ उस्मानाबाद या चारही जिल्ह्यातून वाणिज्य अभ्यास‎ मंडळामध्ये एकूण सहा उमेदवार उभे होते. त्यातील‎ तीन उमेदवार निवडून आलेले आहेत. विद्यापीठाच्या‎ बॅडमिंटन सभागृहात अभ्यास मंडळाच्या‎ निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली.‎

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली‎ निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. या‎ निवडणूकीत पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीच्या‎ मताचा कोटा पूर्ण करून प्रा. येवले विजयी झाले. या‎ विजयानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते‎ त्यांना वाणिज्य अभ्यास मंडळावरती नियुक्ती पत्र‎ देण्यात आले. या यशाबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे‎ सचिव जयदत्त क्षीरसागर, नवगण शिक्षण संस्थेचे‎ सचिव भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर,‎ प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, आदर्श शिक्षण संस्थेचे‎ प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश मचाले,‎ कालिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास‎ कंधारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...