आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा शिक्षक संघाची सरकारकडे मागणी:डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी मार्चचे, ईदपूर्वी एप्रिलचे वेतन द्यावे

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांचे मार्च महिन्याचे वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी व एप्रिल महिन्याचे वेतन रमजान ईदपूर्वी अदा करावे, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत विश्वासराव यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी आणि मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण रमजान ईद हा २२ एप्रिल रोजी साजरा होत आहे. हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक वर्ष समाप्तीमुळे मार्च महिन्याचे लांबलेले वेतन १४ एप्रिलपूर्वी व एप्रिल महिन्याचे वेतन रमजान ईदपूर्वी द्यावे.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. वेतन लवकर देण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाने या निवेदनात केली आहे.