आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:वडवणी येथील डॉ. सुमीत नहार यांनी त्वचारोगतज्ज्ञ परीक्षेत मिळवले यश

वडवणी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी येथील डॉ. पारसमल नहार यांचे द्वितीय चिरंजीव डॉ.सुमित नहार यांनी एम.डी. त्वचारोग तज्ञ परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. डॉ.सुमित नहार यांनी मे २०२२ मध्ये झालेल्या एम.डी. परीक्षेमध्ये बसवेश्वर हॉस्पिटल गुलबर्गा व राजीव गांधी यूनिव्हर्सिटी बेंगलोर येथून चांगल्या गुणवत्तेने पास होऊन वडवणी तालुक्यात प्रथम एम.डी. त्वचारोग तज्ञ होण्याचा प्रथम मान मिळविला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. डॉ. सुमित नहार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे एम आय टी इंग्लिश स्कूल आंबेजोगाई येथून झाले तर एम.बी.बी.एस चे शिक्षण हे विखे पाटील यांच्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रवरा नगर, लोणी येथून झाले.

बातम्या आणखी आहेत...