आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्गात पहिले येण्यापेक्षा ही अभिनय करणे हे काहीसे कठीण आहे. नाटकाने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती, स्मरणशक्ती व बौद्धिक क्षमतेत वाढ होते त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा येऊन स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता निर्माण होते परिणामी नाटक जगण्याचा आत्मविश्वास देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार व नाट्य प्रशिक्षक डॉ. सतीश साळुंके यांनी केले.
परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या ५३ व्या जिल्हास्तरीय बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात डॉ. सतीश साळुंके बोलत होते. याप्रसंगी बलभीम महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. केशव भागवत उपस्थित होते. नटराज पूजनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. साळुंके पुढे म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून परिवर्तन बीडसह मराठवाड्याच्या नाट्यक्षेत्रात रचनात्मक कार्य करीत आहे. या काळात किती कलावंत परिवर्तन ने तयार केले. नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाहीतर ते सामाजिक बदलाचे व व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम आहे. याच ध्येयाने परिवर्तन कार्यरत आहे. पालकांनी मुलांच्या शालेय कागदी गुणांपेक्षा त्यांच्यातील अंगभूत गुणांना महत्त्व द्यायला हवे. नाटकाने मुलांच्या जगण्यात आत्मविश्वास येतो.
त्याचा फायदा त्यांना संपूर्ण जीवनात होतो असे सांगून डॉ. साळुंके पुढे म्हणाले की, परिवर्तनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य प्रमाणात बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी मुकुंद धुताडमल, अशोक घोलप, बाळू निसर्गंध, साळवे नितीन धायगुडे, ओमकार धारूरकर हे कार्यरत आहेत. यापुढेही अशाच पध्दतीने परिवर्तन नाट्यसंस्था जिल्ह्यातून अधिकाधिक कलावंत पुढे आणण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही प्रा.सतीश साळुंके यांनी सांगितले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रथमेश खडकीकर यांनी आभार मानले. या वेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जो व्यक्ती व्यक्त व्हायला शिकेल तो मागे पडत नाही
प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्ये असतात. परंतु अनेकदा विद्यार्थी गुणवंत असूनही केवळ व्यक्त न होता आल्याने तो मागे राहतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना संवादी बनवावे, जेणेकरून मोकळेपणा वाढेल. शिवाय व्यक्त होत गेल्याने आपले व्यक्तिमत्त्वही चतुरस्त्र होते. हल्ली संवाद कमी होत आहे. हे चांगले लक्षण नसल्याचेही मत याप्रसंगी प्रा.केशवराव भागवत यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.