आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून सुमारे १३६७ गावांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या योजनेची कामे हाती घेण्यात आली असून, १०७८ गावांतील योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातील ज्या कामांचा डीपीआर पूर्ण झाला आहे, त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ कामे सुरू करावीत व निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावेत; असे निर्देश आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.
बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधून सुरू व प्रस्तावित कामांचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला..बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीइओ अजित पवार उपस्थित होते.
जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम जोरात सुरू असून, ज्या गावांमध्ये अद्याप कोणत्याही योजनेतून पाणी पुरवठा नाही, अशा सुमारे १०१ गावांमध्ये सौर ऊर्जेसह पाणी पुरवठा योजना नव्याने मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील ५० ते ६० मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या एक्सप्रेस फिडर साठी आवश्यक असलेला १० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे निर्देश गुलाबराव पाटील यांनी विभागाला दिले आहेत.
परळी शहर व लगतच्या गावांना एकत्रित पाणी पुरवठा करून २४ तास पाणी उपलब्ध तरुण देण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणीस ५ कोटी रुपये व अन्य आवश्यक कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजुरी साठी सादर करावा, असेही निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावोगाव-घरोघर पाणी पुरवठ्यासाठी मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेस आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मंत्री गुलाबराव पाटील तसेच विभागाचे बीड जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.