आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदारी:शिरखुर्म्यासाठीचा सुकामेवाही महागला, काजू अन् बदाम 800 किलोने विक्री; खारीक-खोबऱ्याला 220 रुपये किलोचा भाव, ग्राहकांची खरेदीसाठी उडाली झुंबड

पाटोदा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या रमजान ईदच्या दिवशी केल्या जाणाऱ्या शिरखुर्म्यासाठी लागणारा सुका मेवा या वर्षी महागला आहे. भाव वाढले असले तरीही यंदा कोविडचे ढग निवळल्याने ईदचा माेठा उत्साह असून खरेदीत वाढ झाली आहे. काजूचे भाव ६५० रुपयांवरून ८०० रुपयांवर गेले आहेत, तर शेवयाही १०० रुपयांवरून १५० रुपये किलो झाल्या आहेत.

मुस्लिम बांधवांचे महिनाभराचे उपवास संपल्यानंतर रमजान ईदच्या दिवशी गोडधोड पदार्थ केले जातात. उपवासामुळे झालेली झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवले जातात. त्यातच शिरखुर्म्याला महत्त्व आहे. दूध, शेवया आणि सुक्या मेव्यापासून तयार करण्यात येणाऱ्या शिरखुर्म्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही निमंत्रण दिले जाते. या वर्षी मात्र त्यासाठी लागणारे सर्वच पदार्थ महागले आहेत. बदाम, काजू, पिस्ता, खोबरे, शेवया, टरबूज बी, चारोळी, खारीक यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र भाव जरी वाढले आहे.मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा मोठा उत्साह असून पाटोदा शहरातील दुकानांमध्ये सुक्या मेव्याची विक्री सुरू असून हातगाडीवरून फिरून शेवया आणि अन्यपदार्थ विक्री जोरात सुरू आहे.

शिरखुर्म्याचे वेगळे महत्त्व
मुस्लिम बांधवांचे महिनाभराचे उपवास संपल्यानंतर रमजान ईदच्या दिवशी गोडधोड पदार्थ केले जातात. उपवासामुळे झालेली झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवले जातात. त्यातच शिरखुर्म्याला सर्वाधिक महत्त्व आहे.’
- अजीज शेख, नागरिक.

मागणी वाढली
यंदा खारीक, खोबरे व इतर सुकामेव्याच्या भावात वाढ झाली आहे. गेली दोन वर्षे सणावर कोविडचे सावट असल्यामुळे मर्यादित मागणी होती. यंदा मात्र कोविडचे ढग निवळल्याने सुकामेव्याची विक्रमी मागणी आहे.
- अमोल जोशी, व्यापारी, पाटोदा.

बातम्या आणखी आहेत...