आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीड व रोगाचे व्यवस्थापन:खामगाव कृषी विज्ञान केंद्र येथे ड्रोनचे‎ प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम‎

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीड व रोगाचे व्यवस्थापनाकरिता‎ शक्यतो शेतकरी पाठीवरील वापरणाऱ्या नॅप सॅक‎ स्प्रेयर, एचटीपी पंप ई. चा वापर जास्तीत जास्त‎ प्रमाणात करतात आणि हे करत काळजी घेतली‎ जात नाही. त्यावर उपाय म्हणून शेतीसाठी ड्रोनचा‎ वापर सध्याच्या काळात उपयुक्त ठरणार आहे.‎ याच्या वापरामुळे मजुरांची, वेळेची, पैशाची बचत‎ तर होतेच सोबतच ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे‎ ड्रोन वापरणाऱ्या किंवा शेतातील शेतकऱ्यांना‎ याच्या वापरामुळे किंवा त्यातील असलेल्या‎ फवारणीच्या औषधामुळे विपरीत परिणाम घडून‎ येत नाही. शेतीतील ड्रोन वापरा विषयी जागृती व‎ प्रसार करण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा‎ कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव‎ येथे कृषी अभियांत्रिकी विभागामार्फत //"शेतीसाठी‎ ड्रोनचा वापर//" या विषयावर एक दिवसीय‎ प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. प्रा.‎ दिप्ती पाटगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी‎ अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, तालुका कृषी‎ अधिकारी अभय वडकुते यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...