आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महावितरण विरोधात केले ढोल बजाव आंदोलन

दिंद्रुडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलगाव येथील महावितरण उपविभागातून वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन फीडरला वेळेत वीजपुरवठा जोडण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी ढोल बजाव आंदोलन केले.

तेलगाव (ता. धारूर) येथील उपविभागीय कार्यालयातून वडवणी तालुक्यास नवीन फीडरद्वारे वीजपुरवठा करण्यासाठी नवीन विद्युत फीडरचे काम आ. प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले. मात्र अद्यापही वीजपुरवठा जोडला गेला नाही. महावितरणचे सहा. उपअभियंता रोहित थावरे यांनी आंदोलकांची भेट घेत ३३ केव्ही वडवणी फीडरचे काम पूर्ण झाले आहे.

मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठवून या फीडरची वाहिनी सुरू करण्याची आपण मागणी केली आहे. महापारेषणच्या परवानगी नंतर फीडरचा वीजपुरवठा चालू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे, औदुंबर सावंत, राकाँचे तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, दत्तात्रय दुधाने, तेलगावचे सरपंच दीपक लगड, संदिपान खळगे, योगेश सोळंके आंदोलनात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...