आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सांडगे, पापड, कुरडयांसह खारोड्यांचे घराच्या छतावर केले जातेय वाळवण; उन्हाळी वाळवणाच्या कामात पाटोद्यातील गृहिणी व्यस्त

पाटोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच गृहिणींच्या उन्हाळी कामाची म्हणजेच कूरडया, पापड्या, खारोड्या आदी तयार करण्याची लगबग सुरू झाली असून पाटोदा व ग्रामीण परिसरातील घरांच्या छतावर, अंगणात महिला उन्हाळी वाळवणीची कामे करत आहेत. कुरडया, पापड्या, खारोड्या, सांडग्यांसह उपवासाचे पदार्थ म्हणजेच वेफर्स, खिस, पापड्याची देखील वाळवणी केली जात असून त्यामुळे बटाट्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त आहे. पारंपरिक पद्धतीने गृहिणींची दरवर्षाप्रमाणेच यंदाही उन्हाळी कामांची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये महिला गव्हाचा चिक तयार करून त्यापासून आकर्षक व चविष्ट अशा कुरडया बनवतात. तसेच ज्वारीच्या पापड्या, बाजरीच्या खारोड्या, तांदळाच्या पापड्या, हरभरा डाळीचे सांडगे तसेच उपवासासाठी साबुदाण्याच्या पापड्या, भगरीच्या पापड्या, बटाट्याचा खिस, चिप्स असे पदार्थ तयार करून कडक उन्हात ठेवतात. एकदा कडक ऊन लागले की हे पदार्थ नंतर कित्येक महिने चांगले राहतात. व वर्षभर उपयोगी पडतात. सध्या रेडिमेड पदार्थ घेण्याऐवजी गृहिणी स्वत: वाळवणाचे पदार्थ बनवण्यास प्राधान्य देत आहेत.

बाजरीच्या खारोड्याला विशेष महत्त्व : बाजरीच्या खारोड्या कांदा व शेंगादाण्यासोबत खाल्ल्यास अत्यंत चविष्ट लागतात. विशेषतः ग्रामीण भागात या खारोड्यांना महत्त्व आहे. काही ठिकाणी या उन्हाळी वाळवणीच्या कामांमधून रोजगार उपलब्ध होतोय.

बातम्या आणखी आहेत...