आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतशिरोमणी श्री मन्मथस्वामी महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा तीनदिवसीय यात्रोत्सवात ६ ते ७ रोजी दाेन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. यंदाच्या वर्षी चंद्रग्रहणासह महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यांत शेतीची कामे सुरू असल्याने भाविकांच्या संख्येत चाळीस टक्क्यांनी घट झाली. यात्रेच्या दाेन दिवस आधीपर्यंत महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, कर्नाटकसह तेलंगणातील भाविकांनी कपिलधार येथे दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सव साजरा केला जातो. राष्ट्रसंत अमरापूरकर महाराजांनी यात्रोत्सवात दिंडीची परंपरा सुरू केली. यंदाही ६ ते ८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा यात्रोत्सव आयोजित केला आहे. या यात्रोत्सवात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह तेलंगण राज्यातून दिंड्या दाखल होतात. यंदाच्या यात्रेत ६० दिंड्या सहभागी झाल्या. तीन दिवस भाविकांचा मुक्काम असल्याने पार्किंगची अडचण, वाहतूक काेंडी पाहता कमानी जवळ पार्किंगसाठी व्यवस्था केली आहे.
यात्रोत्सवासाठी बीड, परळी, अंबाजोगाई आगारातून प्रत्येकी १५, धारूर, गेवराई, पाटाेदा आगारातून प्रत्येकी १०, माजलगाव ७, आष्टी ८, अशा प्रकारे एकूण ९० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तीनदिवसीय यात्रेसाठी कपिलधार येथे तीनशेवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता.
कार्तिक पौर्णिमेस प्रारंभ हाेण्याच्या मुहूर्तावर महापूजा : कपिलधार येथे साेमवारी कार्तिक पौर्णिमेस प्रारंभ हाेण्याच्या मुहूर्ताला ४.१५ वाजता शासकीय महापूजा करण्यात आली. पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे युवा नेते डाॅ. याेगेश क्षीरसागर, अक्षय मुंुदडा, मनाेहर धाेंडे यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
श्रीक्षेत्र कपिलधार येथील कार्तिक पौर्णिमेनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील विढूळ येथील ३०० युवकांची पायी मन्मथ ज्याेत यात्रा निघते. यंदाचे या ज्याेत यात्रेचे १७ वे वर्ष आहे, असे यात्रेचे प्रमुख अनिल बिच्चेवार यांनी सांगितले. शंभरपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी तीन दिवस परिसरात स्वच्छता माेहीम राबवून सेवा दिली.
१५० स्वयंसेवक
देवस्थान पंच कमिटीच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध सुविधा निर्माण केल्या. दीडशेवर स्वयंसेवक दिवस-रात्र कार्यरत राहणार आहेत. महिनाभरापासून देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रेची तयारी करण्यात आली. - नागेश मिटकरी, सहसचिव, कपिलधार संस्थान
५० क्विंटलचा महाप्रसाद
यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र कपिलधार देवस्थानच्या वतीने बुंदी व मसालेभात (दाेन्ही २५ क्विंटल) व नांदेड येथील सारथी प्रतिष्ठानच्या मसालेभात, गव्हाची खीर, बुंदी असे एकूण २५ क्विंटल असे एकूण तीन दिवस लाखाे भाविकांना ५० क्विंटलचा महाप्रसाद देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.