आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा जिल्हा जात पडताळणी समितीने प्रत्येक महाविद्यालयात जाऊन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणासाठी जी विशेष मोहिम राबवली ती अतिशय उपयुक्त आहे. या शिबिरामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम जलदगतीने होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आबासाहेब हांगे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विज्ञान शाखेतील अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांसाठी तालुकास्तरीय प्रस्ताव संकलन व मार्गदर्शन शिबीर पार पडले.
व्यासपीठावर उपप्राचार्य किशोर मचाले, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, प्रा. शेख अब्दुल समद, प्रा. जितेंद्र कांबळे, लिपिक पोपट गीते, जिल्हा जात पडताळणी समितीचे समन्वयक सय्यद आखेब, प्रकल्प सहाय्यक वाघमारे, हेड कॉन्स्टेबल गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी सय्यद आखेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विज्ञान शाखेतील अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या विशेष शिबिरात एकूण ६७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यात आले. या शिबिरात पाटोदा तालुक्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.