आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ:दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे सूचक विधान

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माना के औरों के मुकाबले कुछ पाया नहीं मैंने, लेकीन खुदको गिराकर कुछ उठाया नहीं मैंने असा शेर म्हणत पंकजा मुंडेंनी भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात मनातील खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना आपण आपली 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु करुया. तेव्हा स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ असे सूचक विधानही पंकजांनी केले.

2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवू
एकदा आपण समर्पण केले. 2024 ला निवडणूक आहे. समर्पणाची ताकद आपण दाखवून देऊ. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून समुद्र दाखवून देऊ. स्वाभीमानाची ताकद दाखवून देऊ. ठिक आहे पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही असेही पंकजा म्हणाल्या. तुम्ही आपापल्या मतदारसंघात जा, आपली वज्रमुठ आवळा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जितना बदल सके उतना खुदको बदल लिया हमने. अब जिनको शिकायत है वो खुदको बदले असे त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडेंचा वारसा अटलजींपेक्षा वेगळा आहे का?
यावेळी वारशाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही तर त्यांनी ज्या दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा झेंडा हाती घेतला त्याचा वारसा मी चालवते. दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयींपेक्षा गोपीनाथ मुंडेंचा वारसा वेगळा आहे का? असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी शत्रूंविषयी वाईट बोलत नाही तर ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते त्यांच्याविषयी वाईट कसे बोलेल असेही त्या म्हणाल्या.

व्यक्तीपेक्षा संघटन श्रेष्ठ
2019 च्या निवडणुकीत राज्यभरात मी सभा घेतल्या. एवढे लोक माझ्यासोबत आले तर माझी ताकद वाढणार की नाही. मी हात जोडून विनंती करते की हा विषय आता बंद करा. काल परवा जन्माला आले नाही. 17 वर्षे राजकारण करते आहे. व्यक्तीपेक्षा संघटन श्रेष्ठ ही आमची शिकवण आहे. मी ते पाळते असे त्या म्हणाल्या.

हात जोडते, नाराजीचा विषय आता बंद करा
मीडियाला मी हात जोडते की हे बंद करा. पुढे कोणती यादी तुमच्याकडे आली की माझे नाव त्यात टाकू नका. मी कुणावरही नाराज नाही. मी का कुणावर नाराज होऊ असे पंकजा म्हणाल्या.

काही मिळाले नाही याचे दुःख नाही
मला काहीही मिळाले नाही याचे दुःख मला नाही. समाजाच्या हितासाठी जे होत असेल ते मला मान्य आहे. समाजाला बांधायचे सोडून समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही. मी क्षमाशील आहे, पण तुम्ही त्याला क्षमा करणार नाही याची मला खात्री आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हा चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा
या मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता लोकांना होती. पण हा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. संघर्ष आमच्या रक्तातच आहे. मी कधी कुणावर खालच्या पातळीवर टीका केली नाही. ते आमच्या रक्तात नाही असे पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाल्या.

हकीकत को तलाश करना पडता है
चर्चा पसरत असतात. हकीकत को तलाश करना पडता है. अफवाहे तो घर बैठे मिल जाती है. हे सत्य आहे, ही हकीकत आहे. ही शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या. माझी खुर्च्या द्यायची ऐपत नाही असे पंकजा म्हणाल्या.

संघर्ष कुणालाच चुकला नाही
प्रीतम ताई म्हणाल्या संघर्ष करो या घोषणा बंद करा. संघर्ष कुणालाच चुकला नाही. गोपीनाथ मुंडेंसारखा भगवान बाबांचा भक्त तुमच्या-आमच्यातला माणूस होऊन गेला. भगवान बाबांनीही खूप संघर्ष केला, पण त्यांनी सत्य सोडले नाही. मुंडे साहेबांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. चाळीस वर्षांच्या राजकारणात फक्त साडेचार वर्षे सत्ता मिळाली. संघर्ष खूप होता असे त्या म्हणाल्या.

जेसीबीतून फुलांचा वर्षाव
तत्पूर्वी पंकजा मुंडे मेळाव्यासाठी गडावर दाखल झाल्या तेव्हा त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत त्यांच्या कनिष्ठ बहीण यशस्वी मुंडेही होत्या. तर वव्यासपीठावर अहमदनगरचे खासदार सुजय विखे, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

बातम्या आणखी आहेत...