आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदिच्छा‎ भेट:खा. मुंडे यांनी घेतली राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री‎ राजनाथ सिंह यांची खा. डॉ.प्रितम मुंडे यांनी संसदेत सदिच्छा‎ भेट घेतली.यावेळी त्यांनी खा. मुंडे यांना भरभरून आशिर्वाद‎ दिले आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या‎ आठवणींना उजाळा ही दिला.राजनाथ सिंह यांच्या भेटीने‎ आपल्याला नवी ऊर्जा आणि चैतन्य मिळाले असल्याची‎ भावना खा.मुंडे यांनी व्यक्त केली.

तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री‎ अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलम्पिक असोसिएशनच्या‎ अध्यक्षा पी.टी उषा यांचीही त्यांनी भेट घेतली. देशातील ड्रॅगन‎ बोट खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाची‎ संधी मिळावी याकरिता ड्रॅगन बोट खेळाला भारतीय‎ ऑलम्पिक असोसिएशनने मान्यता द्यावी अशी मागणी‎ खा.प्रितम मुंडे यांनी त्यांच्याकडे केली.‎

बातम्या आणखी आहेत...