आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती:‘माय माइलस्टोन’च्या मुलांनी साकारले इको फ्रेंडली बाप्पा

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील माय माइलस्टोन प्री-स्कूलमध्ये शनिवारी (दि. २७) इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी रवी क्षीरसागर व तेजस यांनी पालकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्री-स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती तयार केले. चिमुकल्यांसह पालकांनी गणपती बाप्पा माेरयाचा जयघाेष करत या मूर्ती आपापल्या घरी स्थापना करण्याची संकल्प केला.

स्कूलचे संचालक ज्ञानेश्वर तांबे, प्राचार्या सारिका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी यात सहभाग नाेंदवला. सरासरी अर्धा फूट उंचीच्या मातीच्या गणपती मूर्ती पालकांनी चिमुकल्यांच्या मदतीने साकरल्या. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या शिक्षिका नम्रता तांबे, रोहिणी गिते, तनवीर शेख, माधुरी कोरे, प्रीती लामतुरे, अंजली पोपळे, पल्लवी ढाकणे, आशा चव्हाण, माधुरी तांबे, स्वाती लोणके, संध्या जाधव आदींनी पुढाकार घेतला. या वेळी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...