आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक बंद:जिल्हा बंदमध्ये उद्या शैक्षणिक बंद पाळावा

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केलेल्या अक्षम्य विधानामुळे शिवप्रेमी नागरिकांनी सोमवारी (दि. १२) बीड जिल्हा बंदची हाक दिलेली असून या बंदमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांनी शैक्षणिक बंद ठेवून जिल्हा बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रेमी विद्यार्थी संघटनाच्या वतीने केले आहे.

शहरातील सर्व राजकीय पक्षाचे, समविचारी संघटनांचे शिवप्रेमी एकत्र जमले आणि त्यांनी एकमुखाने दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा बंद करण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच उद्या बंदच्या दिवशी सकाळी १०:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमत्र्यांना आणि पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. दि. ७ डिसेंबर रोजी सूर्या लॉन्समध्ये बीड शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांची एक व्यापक बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये विविध पक्षाचे, संघटनांचे सामाजिक संस्थांचे, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या मोर्च्यात सर्व शिवप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संगमेश्वर आंधळकर एआयएसएफचे रामहरी मोरे, नितीन रांजवन, एसएफआय रोहिदास जाधव, संतोष जाधव, राजेश शिंदे, मल्हारी जाधव, संभाजी ब्रिगेडचे गणेश मस्के यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...