आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • Educational Materials Handed Over To 16 Students Of Patoda Taluka Throughout The Year; Support Of Sakal Maratha Madat Group For The Students Who Lost Their Patriarchy |marathi News

पुढाकार:पाटोदा तालुक्यातील 16 विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य सुपूर्द; पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना सकल मराठा मदत ग्रुपचा आधार

पाटोदा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या विद्यार्थ्यांच्या पित्याचे अकाली निधन झाले आहे व त्याचबरोबर ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पाटोदा येथील सकल मराठा समाज मदत ग्रुप हा आधार बनत असून या ग्रुपच्या वतीने मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांच्या पुढाकारातून व लोकसहभागातून अशा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या शालेय साहित्याचे शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पाटोदा येथील मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांच्या पुढाकारातून मागील काही वर्षांपासून सकल मराठा समाज ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यात आदर्श असे उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येतात. हा ग्रुप वंचितांसाठी नेहमीच आधार बनला आहे सध्याच्या काळात शिक्षणासाठी व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारा अवाढव्य खर्चाचा विचार करून या ग्रुपच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षात हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

दोनच दिवसांपूर्वी मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांनी आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत अनेकांनी मदत जमा केली. आता या रकमेतून तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांचे पितृछत्र अकाली हरपले आहे व ज्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा १६ विद्यार्थ्यांना सकल मराठा समाज ग्रुपच्या वतीने संपूर्ण शैक्षणिक साहित्य किट देण्यात येतेयं. यामध्ये दफ्तरापासून ते रजिस्टर, वह्या, पेन, कंपास व इतर सर्व शैक्षणिक साहित्य दिले जात आहे. यासह इयत्ता आठवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक देखील उपलब्ध करण्यात आली आहेत. तालुक्यातील पिंपळवंडी, नफरवाडी, धनगर जवळका, सौंदाणा, गवळवाडी, अनपटवाडी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक साहित्य भेट दिले जाणार आहे.

यापुढेही मदत करणार
ज्या विद्यार्थ्यांचे पित्याचे छत्र हरपले आहे व ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे किट सकल मराठा समाज ग्रुपच्या वतीने आम्ही उपलब्ध करून देत आहोत. यासंदर्भात आवाहन केल्यानंतर अनेकांनी सहकार्य केले. या लोकसहभागातून गरजूंपर्यंत हे शैक्षणिक साहित्य पोहोच केले जाणार आहे. यापुढेही ही मदत करतच राहणार आहोत. सुरेंद्र तिपटे, सामाजिक कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...