आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ बीड संचलित राजर्षी शाहू कन्या माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट नियोजन करून ४ ते ८ डिसेंबर कालावधीत विद्यालयाची शैक्षणिक सहल पार पाडली. या सहलीसाठी ११९ विद्यार्थिनींना घेऊन ओझर- लेण्याद्री -शिवनेरी- भीमाशंकर -आळंदी- देहू- अलिबाग- मुरुड -जंजिरा- महाड- रायगड- प्रतापगड- महाबळेश्वर- वाई- बालाजी मंदिर- जेजुरी -मोरगाव (गणपती) ,यासारख्या ऐतिहासिक,भौगोलिक ,सागरी, सांस्कृतिक ,पर्यावरणीय व धार्मिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थिनींना त्या विषयाचे महत्त्व सांगण्यात आले.
राजर्षि शाहू कन्या विद्यालयाकडून कोरोनाचा कालावधी लोटल्यावर दोन वर्षानंतर प्रथमच सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका एस.डी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख जी.एस. झोडगे व एल.आर. मुंडे, एस.सी. जगताप, के.बी. सोंडगे, डी.एल. तिडके, एम.एच.आगलावे, व्ही.डी. मातकर आदींसह संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. पालक व संस्था पदाधिकाऱ्यांनी याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.