आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई-लातूर (५४८ बी) या महामार्गावरील बीड जिल्हा हद्दीतील बर्दापूर फाटा ते लोखंडी सावरगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशा मागणीसाठी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी केंद्रीय बाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दूरध्वनी करून येथील नागरिकांची अडचण व झालेल्या अपघाताबद्दलची सविस्तर माहिती दूरध्वनीद्वारे देऊन रस्त्याच्या चौपरीकरणासाठीची आवश्यकता सांगितली . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊन याकडे सकारात्मकतेणे लक्ष घालू असा विश्वास दिला आहे .त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत व नेहमी घडणारे अपघात व त्यातील मृत्यूची संख्या कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.
अंबाजोगाई ते लातूर या महामार्गावरील बीड जिल्हा हरीतील बर्दापूर फाटा ते लोखंडी सावरगाव हा ३८ किलोमीटरचा रस्ता प्रत्येक वाहन चालकांसाठी जीवघेणा बनला आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे .२४ एप्रिल रोजी क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन ८ जण जागीच ठार झाले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४०, तर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ अशा एकूण ५५ जणांचा बळी झालेल्या भीषण अपघातांमध्ये गेला आहे. अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह,रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी शासनाकडे लावून घरली आहे. धनंजय मुंडे यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींना स्वतः दूरध्वनी करून बरदापुर फाटा ते लोखंडी फाटा या रस्त्वाचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.