आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:वृद्ध शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

केजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या आजारपणामुळे शेतीतील कामाचा ताण असह्य झाल्याने ७० वर्षांच्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील नांदूरघाट येथे गुरुवारी (२३ जून) सकाळी उघडकीस आली. मधुकर निवृत्ती जाधव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मधुकर निवृत्ती जाधव (७०) हे पत्नीसह नांदूरघाट येथे राहत. त्यांची दोन्ही मुले पुण्याला वास्तव्यास आहेत. आजारपणामुळे त्यांच्या पत्नीला ऊठबस करता येत नव्हती. त्यामुळे घरातील काम करून ते शेती करत होते. वृद्धापकाळात घराचा आणि शेतीतील कामाचा ताण वाढल्याने बुधवारी रात्री शेताकडे जात असलेल्या नाल्याजवळील बाभळीच्या झाडाला दोरीने त्यांनी गळफास घेतला आहे. याप्रकरणी नांदूरघाट पोलिस चौकीचे जमादार अभिमान भालेराव, पोलिस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. गावातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे जावई रमेश अर्जुन सुरवसे (रा.कुंभारी, ता.जि.बीड) यांच्या माहितीवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.