आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधन फाईल मंजूर:वयोवृद्ध तमाशा कलावंतांना मानधन मिळवून द्यावे : मुसळे

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील हजारो तमाशा कलावंत केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येणार्‍या मानधनापासून अद्याप वंचित आहेत. इतर कलावंतांचे मानधन फाईल मंजूर होतात मात्र तमाशा कलावंतांचे मानधन फाईल प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंजूर केली जात नसल्याचा आरोप करत प्रशासनाने मानधनाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला व सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैला मुसळे यांनी केली.

याबाबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, बीड जिल्ह्यात जवळपास ५ हजारपेक्षा अधिक तमाशा कलावंत आहेत. यामधून काही वयोवृद्ध कलावंतांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येणान्या मानधनासाठी वेळोवेळी विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण अर्ज दाखल केले आहेत. मात्र आपल्या प्रशासकीय यंत्रणांकडून दाखल करण्यात आलेल्या वयोवृद्ध कलावंतांच्या फायलींचे दखल न घेता खऱ्या लाभार्थी असणाऱ्या या कलावंतांना हक्काच्या मानधनांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पद्मिनी अंधारे, शोभा मुसळे, कांताबाई दुबे, कुसुमबाई जाधव, आकाशबाई काळे, छाया काळे, शारदा मुसळे, गुलाबबाई काळे, ताराबाई काळे आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...