आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:अरणवाडी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक; राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जनविकास पॅनलचे आठ उमेदवार विजयी

धारूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अरणवाडी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असे दोन पॅनल होऊन निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जनविकास पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. या सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. अरणवाडी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही चुरशीची झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे यांच्या गावची निवडणूक असल्यामुळे ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती.

यामध्ये सुनील शिनगारे यांच्या पॅनलचे स्वतःसह ५ उमेदवार विजयी झाले, तर समोरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जनविकास शेतकरी पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले. यामध्ये भास्कर शिनगारे, राम माने, सतीश शिनगारे, योगिराज फुटाणे, संपत्ती मस्के, कलावती फुटाणे, मधुकर नागरगोजे, रामराव फुटाणे असे ८ उमेदवार विजय झाले. हे पॅनल यशस्वितेसाठी गोरख माने, राधाकिसन शिनगारे, भागवत शिनगारे, श्रीमंत माने, बजरंग माने, सरपंच लहू फुटाणे, सदाशिव शिनगारे, सुनील रुद्रे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...