आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध; पिंपळगाव मजरा सोसायटी आ. क्षीरसागरांच्या ताब्यात

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव मजराची येथील सेवा सोटायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. चेरमनपदी मोहन खांडे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपद पदाच्या निवडणुकीत हरिराम खांडे यांनी १३ पैकी ९ मते घेऊन विजय मिळवला. नूतन संचालकांचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी अभिनंदन केले.

गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळगाव मजरा या सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम असून सरपंच काशीनाथ खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुन्हा ही सेवा सोसायटी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे.

गावकऱ्यांनी एकमुखाने मोहन खांडे यांची संचालकपदी व नंतर चेरमनपदी निवड केली. नूतन संचालक मंडळात हरिराम खांडे, नारायण डुकरे, गोविंद खांडे, बंडू राऊत, शांताबाई सखाराम पडघम, कांताबाई रामराम खांडे यांचा समावेश आहे. गावचे सरपंच श्री काशिनाथ खांडे, उपसरपंच राजू खांडे, गणपत खांडे, पंडित खांडे, नवनाथ खांडे, पुष्पल खांडे, अनिल खांडे, रमेश पडघम, हरीश्चंद्र खांडे, संदीपान खांडे, श्रीकृष्ण खांडे, सखाराम खांडे, बालनाथ खांडे आदींनी निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. यासह माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनीही बीड येथे या संचालक मंडळाचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...