आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत ; राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय या समाजाची प्रगती होणार नाही

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना महाराष्ट्र मुस्लिम आतार समाज परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेख बाबुभाई आतार, राष्ट्रीय सल्लागार शेख वजीर शेख चाँदसाब आतार, जिल्हा सचिव शेख रईस शरफोद्दिन आतार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आतार समाज हा आर्थिकदृष्टया कमकुवत व मागासलेला असून शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहे. तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत आतार समाजातील प्रमाण हे नगण्य आहे व आतार समाजाचा व्यवसाय हा छोटा आहे. आर्थिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय या समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत अशी मागणी निवेदनात महाराष्ट्र मुस्लिम आतार समाज परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेख बाबुभाई आतार, राष्ट्रीय सल्लागार शेख वजीर शेख चाँदसाब आतार, जिल्हा सचिव शेख रईस शरफोद्दिन यांनी केली आहे. तसेच आतार समाजाच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...