आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आरक्षणाशिवाय निवडणुकांमुळे ओबीसींचे होणार नुकसान; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या पंधरा दिवसांत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्या आहेत. त्यानंतर आता जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांमधून आरक्षणविना निवडणूक होणार असल्याने तीव्र भावना व्यक्त होत आहेत. राजकारण्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची वेळ आणल्याने समाजाचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली.

वेळेवर बोलले गेले पाहिजे : ओबीसी शासकीय-निमशासकीय सेवा व शिक्षणामध्ये ७२ टक्क्यांपर्यंत भरती झाले असताना आणि ही गोष्ट सामाजिक संतुलनासाठी घातक असताना कुणीच काही बोलायचे नाही का? असा प्रश्न हे भीषण वास्तव कळलेल्या लोकांच्या मनात निर्माण झाल्याचे आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.

ही तर ओबीसींची फसवणूक
ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अडीच वर्ष काय केलं? हा प्रश्न कोर्ट, जनता, विरोधक विचारत आहेत. ओबीसी विचारतोय. त्यामुळे हा दोष त्यांचा आहे, त्यांनी कितीही स्वतःची पाठराखण केली तरी ओबीसींची ही फसवणूकच आहे, त्यांच्या आरक्षणाला धोका देण्याचा प्रयत्न आहे. राज्यात सर्व व्यवहार सुरळीत आहेत मग ओबीसी आरक्षणाच्या डेटासाठी निधी का मिळत नाही?
- पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप.

आरक्षणाशिवाय निवडणुका हा आमच्याशी द्रोहच
राज्य सरकारने राज्यात १९९४ पासून आरक्षण लागू केले. ५६ हजार प्रतिनिधी दर पाच वर्षांनी ओबीसी प्रवर्गातून निवडले जात होते. मात्र, ४ मे २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण पुन्हा एकदा थांबवले आहे. ओबीसी प्रधानमंत्री असूनही ओबीसींचा विश्वासघात सरकारने केला आहे. नागपूरच्या रेशीम बागेतील प्रमुखांच्या हातातले कळसूत्री बाहुली म्हणून शासन काम करत आहेत.
-सुशीला मोराळे, ओबीसी नेत्या.

झारीतील शुक्राचार्य कोण? हे ओबीसींनी आता ओळखावे
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, ही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. तातडीने निवडणुका घेण्यात याव्यात असे राज्य निवडणूक आयोगाला आदेश आहे. ओबीसी आरक्षणाला मंडल आयोग लागू करण्यापासून विरोध करणारी शक्ती आजही तशाच पद्धतीने कार्यरत आहे. झारीतील शुक्राचार्य कोण? हे ओबीसींनी ओळखले पाहिजे.
-कल्याण आखाडे, संस्थापक अध्यक्ष, सावता परिषद.

बातम्या आणखी आहेत...