आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई:अंबाजोगाईत इलेक्ट्रीक बॅटरीचा स्फोट, दुचाकीच्या शोरूमला आग  लागून लाखोंचे नुकसान

अंबाजोगाईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जयवंतीनगर भागातील ‘जगदाळे मोटर्स’ या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या शोरूममध्ये दुचाकीच्या हेवी लिथेनियम बॅटरीचा स्फोट होऊन शुक्रवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शोरूममधील मोटारसायकल जळून खाक झाल्या असुन नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई शहरातील जयवंतीनगर भागातील ‘जगदाळे मोटर्स’ या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या शोरूमला मोटारसायकलच्या हेवी लिथेनियम बॅटरीचा स्फोट होऊन शोरूमला आग लागली. आगीमध्ये शोरूममध्ये उभ्या असलेल्या सहा मोटारसायकलसह इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तात्काळ पोहोचल्यामुळे आग आटोक्यात आली. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी तात्काळ वीज बंद करण्याची सूचना महावितरण कंपनीस केली. दोन्ही फिडरवरील वीजपुरवठा तात्काळ खंडित झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...