आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा:अंबाजोगाई येथे विजेचा खेळखंडोबा, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

अंबाजोगाई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठ-दहा दिवसांपासून अंबाजोगाई शहर व परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या सणासुदीचे व उत्सवाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असून महावितरणने कायमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत कार्यकारी अभियंत्यांना सादर केलेल्या निवेदनात मोदी यांनी म्हटले आहे, अंबाजोगाई शहर आणि जवळपास परिसरातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवास व गणेश मंडळासदेखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या खंडित विजेमुळे शहराला नियमितपणे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. त्याचा देखील नाहक त्रास नागरिकांस सहन करावा लागतो आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विजेबाबत माहिती विचारली असता कर्मचारीही ग्राहकांना योग्य प्रतिसाद देत नाहीत.

कार्यकारी अभियंता यांनी जातीने लक्ष देऊन सतत खंडित होणारा वीजपुरवठा तत्काळ नियमित करावा, अशी मागणी करावी, राजकिशोर मोदी, मनोज लखेरा, महादेव आदमाने, तानाजी देशमुख, गोविंद पोतंगले, धम्मा सरवदे, हमीद चौधरी, सय्यद ताहेर, अकबर पठाण, दयानंद लोंढाळ, दत्ता सरवदे, शाखेर काझी, बालाजी शेरेकर, सचिन जाधव, अशोक जेधे, महेबूब गवळी, रफीक गवळी, अमजद पठाण यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...