आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले, दोन गावांचा संपर्क तुटला; पिंपरखेडमध्ये तिघांना जलसमाधी

माजलगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी धरण पूर्ण क्षमतेने भरले. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून धरणाचे ११ दरवाजे दोन मीटरने उघडून तब्बल ८८ हजार ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू हाेता. नदीपात्र तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे तालुक्यातील सांडस चिंचोली, डेपेगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पाण्याचा हा नजारा पाहण्यासाठी धरण परिसरात गर्दी झाली होती.

पिंपरखेडमध्ये तिघांना जलसमाधी : १७ वर्षीय मुलगा बंधाऱ्यात मासेमारी करताना पाय घसरून पडल्याने त्याला वाचवण्यासाठी बाप-लेक गेले, मात्र ते गटांगळ्या खात असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी आणखी एकाने उडी घेतली. मच्छीमार मुलगा वाचला, मात्र त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांना जलसमाधी मिळाली. पिंपरखेड(ता. वडवणी) येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. मधुकर रोहिदास खळगे (५४), अजय मधुकर खळगे (२४) आणि अजय ऊर्फ भैया यादव उजगरे (१८) अशी मृतांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...