आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजप्रबोधन:स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजप्रबोधनावर भर

रवी मठपती | अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाने समाजप्रबोधनाची परंपरा आजतागायत जपली. यंदाही या मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात तीन फूट उंचीच्या गणेशमूर्तीची देवघरी प्रतिष्ठापना केली. यंदा पाच संतांच्या कार्याचा आरास देखावा हे गणेश मंडळ दाेन दिवसांनी साकारणार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यापाठीमागे त्यांचा स्वातंत्र्य मिळवणे हा उद्देश होता. हा उदात्त हेतू समोर ठेवून राज्याचे माजी लोकायुक्त स्व. न्या. व्यंकटराव देशपांडे, अॅड. स्व. आर. डी. देशपांडे, स्व. तात्यासाहेब कुंबेफळकर, दत्त देवघर संस्थानधिपती स्व. सर्वज्ञ गोस्वामी व इतर दासोपंतांचे वशंज, स्व. सिद्धराज दीक्षित, स्व. अॅड. पंडितराव कुर्डकर, स्व. अण्णासाहेब देशपांडे, स्व. अॅड. राजारामपंत सोनवळकर, स्व. हरिभाऊ देशपांडे, माजी नगराध्यक्ष स्व. नारायणराव जोशी, स्व. किशनराव देशपांडे, अधूनमधून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विविध ठिकाणची तरुण मंडळी, स्व. गोदावरीबाई पत्की, स्व. कमळाबाई देशपांडे काही महिलादेखील उत्सवानिमित्ताने एकत्र येत होत्या. सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, संमेलनातून स्वातंत्र्यासाठी लोकजागृती होत असे. येथील थोरल्या देवघराच्या चौघड्यावरील देशप्रेमाने भारावलेल्या सर्वांना काही जणांनी सूचना केल्या. स्वातंत्र्याचा लढा प्रखर ठेवण्याचा निर्धार गणेशमूर्तीसमोर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखावा त्या कालखंडात अविस्मरणीय राहिला.

शहराच्या, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी देखावा पाहिला होता. तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, परीक्षक मंडळ यांनी कौतुक करून प्रथम पारितोषिकाचा सन्मान दिला. या गणेश मंडळाने समाजप्रबोधनपर देखाव्याची परंपरा साकारली. पुणे शहरानंतर शाही पालखी सोहळा केवळ याच मंडळाने साकारला. नंतरही पक्षी, प्राणी, पर्यटन, धार्मिक स्थळे देखाव्यांतून दाखवली व पारितोषिके पटाकवली. या मंडळाला लोकप्रियता मिळाली ती मेळे बसवल्याने. देशपांडे (मुकादम) हे नियोजन करत सादरीकरण व्हायचे. सर्व देशपांडे, गोस्वामी मंडळ घरच्यांनी काम केले. पुढील काळात पर्यावरण प्रदूषण, आरोग्याची माहिती देखाव्याने नागरिकांची मने जिंकली.

यंदा पाच संतांच्या कार्याचा देखावा साकारणार
यंदा या गणेश मंडळाने सर्वज्ञ दासोपंत, आद्यकवी मुकुंदराज, कृष्णदयार्णव बाबा महाराज सायगावकर या ५ संतांच्या कार्याचा आरास देखावा सादर करणार आहेत. मिरवणुकीत संत गजानन महाराजांच्या पालखीचा देखावा मुख्य आकर्षण असेले. या मंडळातर्फे नेत्र शिबिरे घेण्यात आली. यापूर्वीही स्वच्छता अभियानाबाबतची जनजागृती, महागाईचा भस्मासुर याचा देखावा साकारून परिस्थिती मांडली होती.

बातम्या आणखी आहेत...