आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बीड शहरात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन बीड येथील शांताई हॉटेल मागील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले आहे. बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन बीड कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूल, जेबीएन इंजिटेक प्रा. लिमिटेड, दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद, टॅलेन सेतू सर्व्हिस प्रा.लि.ठाणे, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड बीड, वायरलेस जॉब्स कन्सल्टन्सी, हर्षवर्धन सेवाभावी संस्था बीड, द कुटे ग्रुप बीड, ऑरिक ग्रीन औरंगाबाद, मेगा फीड प्रा.लि. आदी कंपनीच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अॅप्लाय करावे व दि.३ नोव्हेंबर रोजी गुरुकुल इंग्लिश स्कूल, गुरुकुलनगर, शांताई हॉटेल मागे, काझीनगर जवळ, जालना रोड, बीड येथे प्रत्यक्ष येऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...