आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशीर:स्थगिती आदेश असतानाही अतिक्रमणे काढणे बेकायदेशीर

गेवराई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही अतिक्रमण धारकांविरुध्द केलेली कारवाई बेकायदेशीर असून केवळ आ.लक्ष्मण पवारांच्या जीवावर मुख्याधिकारी मस्तीत वागले आहेत. गोरगरीबांच्या संसाराची राखरांगोळी करणारे हे पाप कोठे फेडतील ? गेवराई शहरातील सर्व अतिक्रमणे सरसकट काढून जिल्हा परिषद शाळेलाही मुक्त श्वास घेऊ द्या असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.

अतिक्रमण धारकांच्या प्रश्नावर रविवारी अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेत कारवाईचा निषेध केला. यावेळी पत्रकार परिषदेला अतिक्रमण बाधित व्यापारी उपस्थित होते. पंडित म्हणाले, एकीकडे आमदार सांगतात व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन ही कारवाई केली तसे असेल तर मग हे गोरगरीब व्यापारी दारोदार का फिरत आहेत? नगर परिषदेच्या जागेवरील व्यापारी गाळ्यांचा किराया दिवसेंदिवस कमी होत असताना यांच्या मालमत्तेचा किराया वाढत आहे. त्यामुळे हे षडयंत्र कोणाचे हे आता लपून राहिले नाही.

शहरात केवळ एवढेच अतिक्रमण नव्हते, उच्च न्यायालयाने सुध्दा अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेले असताना वर्षानुवर्षे त्याला संरक्षण का दिले जात आहे? जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बिअरबार, मटका, सोरट, क्लब यांसारखे उद्योग कोणाच्या आशिर्वादाने चालतात? असा सवाल त्यांनी केला. या अन्यायाविरुध्द आपण लढणार असून अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देवू. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक रविंद्र बोराडे, राजेश राऊत, लक्ष्मीबाई पंडित, सचिन सुभाष गुंजाळ यांच्यासह अतिक्रमण धारक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...