आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत, परंतु पालकच जर हातात रिमोट घेऊन सतत टीव्ही पाहत असतील तर मुलंही त्यांचेच अनुकरण करतील. म्हणून पालकांनी गांभीर्याने मुलांना वाचन संस्कृती कशी लाभेल याची काळजी घ्यावी. इंग्रजी माध्यमांच्या शाळा बालकांच्या वाचनाचे मन तोडण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते यांनी केले.
घनसावंगी येथील ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळच्या सत्रात बाल मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते यांच्या हस्ते परितोषिकांचे वितरण झाले. बाल मेळाव्याचे उद्घाटक इंद्रजित भालेराव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड काढल्यास तुम्हीही मोठे होऊ शकतात, असे सांगितले. सूत्रसंचालन जगन दुर्गेकर यांनी केले, तर आभार भाऊसाहेब देवकर यांनी मानले. या वेळी मासेगाव, ता. घनसावंगी येथील सरस्वती भुवन शाळा रांजणी या शाळेचा विद्यार्थी अथर्व परेश आनंदे या नववीत असलेल्या विद्यार्थ्याने कार्यक्रम सुरू असतानाच साहित्यिक इंद्रजित भालेराव यांचे हुबेहूब चित्र रेखाटल्याने उपस्थित साहित्यिकांनी त्याचे विशेष कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.