आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायोगेश्वरी शिक्षण संस्था अंतर्गत एसआरटी महाविद्यालयाच्या परिसरात “पर्यावरण कट्टा” उपक्रम राबवण्यात येत आहे. याठिकाणी मेजर एस.पी.कुलकर्णी यांच्या पुढाकारातून निसर्ग संवर्धनविषयक जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयीन मुलांना वृक्ष लागवड, निसर्ग संगोपन चळवळ, जलबचत, प्रदूषण नियंत्रण आदी विषयांवर माहिती व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी हे मानवाच्या निसर्गामधील ढवळाढवळीचे परिणाम. त्यामुळे सिमेंट काँक्रीटची जंगले निर्माण झाली. त्यामुळे वृक्षाची तोड मोठ्या प्रमाणात झाली. अशा स्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी पर्यावरण कट्ट्यावर चर्चा करून समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे मेजर एस.पी.कुलकर्णी यांनी सांगितले. प्रत्येकाने किमान तीन झाडे लावावे. अवतीभोवती संपन्न निसर्ग असेल तर नैराश्य दूर होते, असेही एस.पी.कुलकर्णी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.