आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व:भाजपचा झेंडा‎ फडकवून सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित; चंदन सावरगाव, भाटुंबा सेवा सोसायटीवर आडसकर यांचे वर्चस्व‎

केज‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील चंदन सावरगाव, भाटुंबा या गावांतील सेवा‎ सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आडसकर गटाच्या‎ पॅनलने बाजी मारली आहे. या दोन्ही सोसायट्यांवर भाजपचे‎ ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांचे वर्चस्व निर्माण झाले असून‎ त्यांनी विजयी सत्कार केला.‎ चंदन सावरगाव आणि भाटुंबा येथील सेवा सहकारी‎ सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते‎ रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गटाने पॅनल‎ उभे करीत बाजी मारली.

दोन्ही सोसायट्यांवर भाजपचा झेंडा‎ फडकवून सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. विजयी‎ उमेदवार आणि पॅनल निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या‎ प्रमुखांचा रमेश आडसकर यांनी सत्कार केला. या वेळी माजी‎ उपसभापती लक्ष्मीकांत लाड, अरुण धपाटे, सुरेंद्र तपसे,‎ मुंबईतील उद्योजक बाळासाहेब गवळी, राजाभाऊ तपसे,‎ दादासाहेब ससाणे हे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...