आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक दल:बीड शहरात महिला समता सैनिक दल स्थापन

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह ढाका यांच्या पुढाकाराने बीड शहरात महिला समता सैनिक दलाची स्थापना केली असून पल्लवी वाघमारे व कोमल वाघमारे या एनसीसी छात्रांच्या रूपाने सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. पल्लवी वाघमारे या दल प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

बीड येथे समता सैनिक दल पुन्हा एकदा जोमाने कार्यरत असून महिला समता दलाचीही स्थापना करण्याच्या दृष्टीने अमरसिंह ढाका यांनी पुढाकार घेतला होता. त्यास प्रतिसाद देत बीड महिला समता सैनिक दल प्रमुख म्हणून पल्लवी वाघमारे हिची निवड केली. ढाका यांनी या जबाबदारीबद्दल वाघमारे यांना पंचशील ध्वजाचे टी-शर्ट भेट देत अभिनंदन केले. येत्या १६ मेच्या बुद्ध जयंतीपर्यंत हे पथक आणखी सक्रिय करणार असल्याची माहिती अमरसिंह ढाका, पल्लवी वाघमारे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...