आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ पुस्तकामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक १९२३ साली लंडनमध्ये प्रकाशित झालं. तेव्हा ते केवळ ३२ वर्षांचे होते. त्यांच्या आयुष्यातली पहिली डॉक्टरेट ते ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून मिळवत होते. त्यावेळचा त्यांचा हा प्रबंध होता. या प्रबंधातूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापन झाली, असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील वडवणी, चौसाळा, बोरफडी, खंडाळा, आहेर वडगाव, पालवन, शिवणी, मादळमोही, आनंदवाडी, रुई , जिरेवाडी, शिदोड, पिंपळादेवी, वाकनाथपूर, भाळवणी येथे आयोजीत करण्यात आलेल्या जयभीम महोत्सवात पप्पू कागदे बोलत होते.

जयभीम महोत्सवात उपस्थितांना संबोधित करताना पप्पू कागदे म्हणाले की, कायदेतज्ज्ञ बाबासाहेबांची 'घटनाकार' म्हणून असलेली ओळख सर्वदूर आहे. त्यांनी भारतीय समाजात शतकानुशतकांच्या जातीच्या उतरंडीवर पिचून सगळ्यात शेवटी उभ्या असलेल्या दलित समुदायामध्ये पेटवलेली चेतना आणि एकहाती घडवून आणलेली क्रांती त्यांना 'महामानव' पदापर्यंत घेऊन जाते.

त्यांचं व्यक्तिमत्व सर्वव्यापी आहे.धर्म, मानववंशशास्त्र, सामाजिक शास्त्रं, राज्यशास्त्र, एक ना अनेक, असे कोणतेही विषय त्यांच्या प्रज्ञेच्या कक्षेतून सुटले नाहीत. पण त्यांच्या उपलब्ध सर्व लेखनातून, भाषणांतून, इतर साहित्यातून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. ती म्हणजे, त्यांच्या बुध्दीच्या आणी हृदयाच्या सर्वात जवळ असणारा विषय होता अर्थशास्त्र.असे मत पप्पू कागदे यांनी यावेळी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...