आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपादन:न्यायालयाच्या आदेशानंतरही भूसंपादनाचे भिजत घोंगडे कायम

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरवंंडी ते राजुरी या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन व मावेजाच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. या प्रश्नी माजी मुख्य अभियंता दिगंबर मळेकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सहा आठवड्यांत मावेजा देण्याचे आदेश देऊनही प्रशासनाने अद्यापही मावेजा दिलेला नाही त्यामुळे या प्रश्नी आता अवमान याचिका दाखल करण्याची तयारी केली जात आहे.

नगर आणि बीड जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून नगर जिल्ह्यातील खरवंडी कासार ते बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रयत्नाने मंजूर करुन आणला गेला होता. २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली. मात्र, १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे हे काम चार वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही.

भूसंपादन आणि मावेजा यामध्ये अनेक ठिकाणी काम रखडले आहे. भूसंपादन विभाग गांभीर्याने काम करत नसल्याचा आरोप होत आहे. मावेजा मिळण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता दिगंबर मळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सहा आठवड्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन मावेजा देण्याचे आदेश १८ ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र, अद्यापही ही प्रक्रिया झालेली नाही. वारंवार पत्रव्यवहार, निवेदन, मागणी करुनही भूसंपादन विभाग लक्ष देत नसल्याने आता अवमान याचिका दाखल करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...