आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:तीन वेळा काम करूनही रस्ता‎ अर्धवटच; आंदाेलन करणार‎

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मिलिंद विद्यालय ते अंबेवेस‎ रस्त्याचे काम तीन वेळा करूनही रखडलेलेच आहे.‎ अंबेवेसकडील बाजुने हा रस्ता खोदून ठेवल्याने या‎ भागातील नागरिकांचे राणी लक्ष्मीबाई टॉवरकडे‎ जाण्यासाठी रस्ता नसल्याने हाल होत आहेत.‎ शहरातील मिलिंद विद्यालयासमोरून अंबेवेसकडे‎ येणारा रस्ता रहदारीचा आहे. शहरातील वैद्यनाथ‎ मंदिर, नेहरू चौक, मोंढ्याकडे जाण्यासाठी या‎ रस्त्याचा उपयोग होतो.

रस्त्यावर भाजी मंडई‎ असल्याने परळीत येणारे शेतकरी या रस्त्याचा वापर‎ करतात. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असुन‎ विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या‎ रस्त्याचे तीन वेळा काम करण्यात आले. तरीही‎ रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. मागील चार‎ दिवसांपासून नालीकामसाठी रस्ता खोदून ठेवला‎ आहे. हे काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा अन्यथा‎ पालिकेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे‎ कार्यकर्ते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...