आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण खनिजाची लूट:घाटाचे लिलाव नाहीत तरीही वाळू उपशाचा सपाटा सुरूच ; गेवराईत महसूलच्या कारवाया तोकड्या

गेवराई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातून सध्याच्या परिस्थितीत अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाच्या वतीने मागील आठवड्यात काही कारवाया झाल्या आहेत मात्र तरीही अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात गोदावरीचे पात्र ७० कि.मी.असून ३२ वाळुघाट आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत नदी पात्रात जवळपास बहुतांश ठिकाणी दुथड्या पाणी असताना तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातील राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, सुरळेगावसह काही ठिकाणी नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. या ठिकाणाहून केनीच्या माध्यमातून वाळूचा अवैध वाळू उपसा करून हायवा, ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेकडो ब्राॅस वाळू वाहतूक केली जात आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी मागील आठवड्यात काही ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने चार कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून अवैध केनीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा करून हायवा आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरु आहे.

नदीपात्रात जीवघेणे खड्डे
गोदावरीच्या पात्रातून विविध ठिकाणांहून होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे लगेच नदीपात्रात खड्डे पडणे, यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, रस्ते खराब, पथकाच्या भितीने वाहने जोरात चालवणे यामुळे परिसरात आता अपघात वाढले आहेत.

सीसीटीव्ही उरले आता नावालाच
शहरातील नवीन बसस्थानक, कोल्हेर रोड, ताकडगाव रोड सह आदि ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहेत. कारण या सर्व ठिकाणाहून ही वाहने शहराच्या मुख्य भागातून सुसाट वेगाने जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...