आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कॉमर्स शाखा घेऊनही उत्तम भविष्य घडवता येऊ शकते, सोनल नहार यांचे प्रतिपादन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यात सर्व विद्यार्थी आणि पालक यांचा कल मेडिकल किंवा अभियांत्रिकी या शाखेकडे जास्त आहे. कॉमर्स शाखा (वाणिज्य) घेऊन ही उत्तम भविष्य घडवता येऊ शकते, हे पालक व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी विशेष जनजागृती करावी लागते, असे प्रतिपादन सोनल नहार यांनी केले.

बीड शहरामधील नहार्स प्रोफेशनल अकॅडमी येथे सी.ए. फाउंडेशन बॅचसंदर्भात विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमात नहार बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, बीड मध्ये आपण कॉमर्स क्लासेस चालू करून आपला एक पटर्न निर्माण करावा हा मानस त्यांनी ठेवला. २०१४ मध्ये अकरावी व बारावी कॉमर्स क्लासेस ची सुरुवात त्यांनी केली व पुढे चालून सी. ए. फाउंडेशन बॅचदेखील सुरू केली. मागील आठ वर्षांपासून या क्लासेसच्या यशाच्या परंपरेचा आलेख हा चढता आहे.

पहिल्याच वर्षी मिळालेल्या उत्तम निकालामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी ठरवले की आता मागे सरकायचे नाही. एक उत्तम शिक्षकांची टीम तयार करून, विध्यार्थ्यांना उत्तम शिक्षण कसे देता येईल, यावर भर दिला.काळानुरूप आपण बदललं पाहिजे या जनिवेतून नहार्स प्रोफेशनल एकाडमी सर्व सोईयुक्त डिजिटल क्लासरूम मधे स्थलांतरित होत आहे. शहरात कॉमर्स मध्ये शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून च एक परिपूर्ण क्लासेस कॉमर्स शाखेसाठी चालू करावेत हे स्वप्न मी उराशी बाळगून होते आणि आज ते सत्यात उतरत आहे याचा मला खूप आनंद होतो आहे.बीड मध्ये शाहूनगर परिसरात नहार्स प्रोफेशनल अकॅडमी ची सुरुवात येत्या २ एप्रिल ला होत आहे, असे सोनल नहार यांनी सांगितले.

प्रामाणिक प्रयत्न, अनुशासन, अथक परिश्रमातून लाभच
विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातील अभ्यासासोबत सॉफ्ट स्किल कसे विकसित करता येतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या प्रत्येक शंकेचे समाधान कसे करता येईल यावर सर्व शिक्षकांचा विशेष भर आहे. प्रामाणिक प्रयत्न,अनुशासन,अथक परिश्रम या त्रीसूत्रीच्या जोरावर आज त्यांनी नहार्स प्रोफेशनल अकॅडमी च नाव जिल्ह्याबाहेरदेखील गाजवलं आहे म्हणूनच आता बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थीदेखील इथे शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले आहेत ही अभिमानाची बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...