आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहनुमानगडाचा परिसर हा मुंडे साहेबांवर जिवापाड प्रेम करणारा आहे. ते अनेक लोकांचे पितृछत्र होते. त्यांच्या जाण्याने अजूनही लोकांना आठवण येते व डोळ्यांत अश्रू येतात. वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आजही त्यांच्या नावाशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. राजकारणात माझा काही स्वार्थ नाही. चांगले कर्म करत राहणे आपले कर्तव्य आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण कष्टकऱ्यांसाठी सेवेसाठी खर्च करत आहे, असे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. श्रीक्षेत्र हनुमानगड (ता. पाटोदा) संस्थानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता सोमवारी झाली. याप्रसंगी मुंडे बोलत होत्या. करवीर पीठाचे शंकराचार्य, संस्थानचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे वाजत-गाजत मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत करण्यात आले. वाजत-गाजत रथातून त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. या सोहळ्यास उपस्थित राहून पंकजा मुंडे यांनी कीर्तनाचा लाभ घेतला. जगद्गुरू शंकराचार्य व बुवासाहेब खाडे महाराज यांनी मार्गदर्शन केले.
कष्टकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा व्हावी : श्रीक्षेत्र हनुमान गड संस्थान परिसरातील मंदिरात याप्रसंगी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी पार पडले. शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांवर महालक्ष्मीची कृपा व्हावी, अशी प्रार्थना पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.