आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन‎:नामसंकीर्तनावर प्रत्येकाने भर द्यायला‎ हवा : दत्त मंदिरात काल्याचे किर्तन‎

धारूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वराचे नामस्मरण करणे हे पुण्याचे काम‎ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या साधनेला वेळ‎ द्यावा. नामसंकीर्तन हा भक्तीचा सोपा मार्ग असून त्यावर‎ भर द्यायला हवा, असे प्रतिपादन पांडुरंग महाराज मुंडे‎ यांनी केले. धारूर शहरातील दत्त मंदिर येथे‎ दरवर्षीप्रमाणे यंदाही चातुर्मास समाप्तीनिमित्त काल्याच्या‎ कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. पांडुरंग महाराज मुंडे‎ यांच्या अमृततुल्य अशा वाणीतून दत्त मंदिर येथे‎ कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला.

यावेळी‎ तालुक्यातील कीर्तनकार प्रकाश महाराज साठे,‎ तबलावादक भैरू महाराज शिनगारे, अंकुश दराडे,‎ उद्धव ठाकरे, महादेव शिनगारे गुरुजी, सुरेश शिनगारे,‎ अश्रूबा शिनगारे, माणिक शेळके, कृष्णा शेळके, राम‎ साखरे, अंकुश साखरे, गणेश शेळके, श्याम शिनगारे,‎ अंबादास ढगे, चंद्रकांत फुके यांच्यासह दत्त मंदिर‎ भजनी मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम‎ पार पडला. किर्तन सेवा संपूर्ण झाल्यानंतर सर्व‎ भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...