आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय‎ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट‎:ईडब्ल्यूएस आरक्षणाची‎ अंमलबजावणी करावी‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी‎ ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर होत‎ असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज‎ उठवत प्रवेश प्रक्रियेत ईडब्ल्यूएस‎ आरक्षणाची अंमलबजावणी‎ करण्यासाठी शिवसंग्रामच्या‎ शिष्टमंडळाने राज्याचे शालेय‎ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट‎ घेतली.‎ देशातील केंद्र सरकारने सन २०१९‎ मध्ये १०३ व्या घटनादुरूस्तीने‎ ईडब्ल्यूएस आरक्षण कोटा लागू केला‎ होता. संविधानाच्या कलम १५ आणि १६‎ नुसार शिक्षण आणि नौकरीमध्ये‎ आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना हे‎ आरक्षण लागू केले आहे.

त्यानंतर‎ सर्वोच्य न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश‎ यु.यु.ललित यांच्या अध्यक्षतेखाली ५‎ सदस्यीय घटनापिठाने ७ नोव्हेंबर २०२२‎ रोजी हे आरक्षण कायम केले आहे. या‎ बाबतीत नवोदय विद्यालयातील इयत्ता‎ ६ वीच्या प्रवेश परिक्षेसंदर्भात जाहिरात‎ प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये‎ ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलेले नाही.‎ ईडब्ल्यूएस आरक्षणाची तात्काळ‎ प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधीत‎ सर्व यंत्रणेला निर्देश देवून ईडब्ल्यूएस‎ कोटयातील विद्यार्थ्यांना दिलास‎ मिळवून द्यावा, ही विनंती शिष्टमंडळाने‎ राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर‎ यांच्याकडे केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...