आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी‎:दोन दिवसांत 16 हजार‎ नागरिकांची तपासणी‎

बीड‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथे गुरुवार आणि शुक्रवार‎ असे दोन दिवस झालेल्या‎ जिल्हास्तरीय इज्तेमामध्ये जिल्हा‎ आरोग्य विभागाच्या वतीने १६‎ हजार ७७२ नागरिकांची आरोग्य‎ तपासणी करण्यात आल्याची‎ माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा‎ आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते‎ यांनी दिली.‎ दाेन दिवसीय या सोहळ्यात‎ लाखोंच्या संख्येत नागरिक येणार‎ असल्याने या ठिकाणी आजार‎ उद्भवू नयेत यासाठी आरोग्य‎ तपासणी मोहिम हाती घेतली होती.‎

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. अमोल गिते यासाठी‎ तीन पथके, जिल्हा हिवताप‎ कार्यालयाच्या वतीने एक पथक,‎ आणि जिल्हा सामान्य‎ रुग्णालयाच्यामार्फत एक पथक‎ असे एकूण पाच पथके तयार‎ करण्यात आले होते. या पथकांनी‎ साथीचे आजार उद्भवू नयेत,‎ जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा‎ व्हावा, सांडपाणी व्यवस्थापन‎ व्हावे यासाठी परिसर आणि विशेष‎ स्वच्छता या अनुषंगाने काम केले.‎ यामध्ये दोन दिवसांत पाण्याच्या‎ १८९ ओटी चाचण्या करण्यात‎ आल्या सर्व चाचण्यांचा अहवाल‎ चांगला आल्याने हे पाणी‎ पिण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष‎ होता. तर, सांडपाण्याचीही‎ विल्हेवाट लावली गेली.‎ जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शाफे‎ यांच्या नेतृत्वात आरोग्य पर्यवेक्षक‎ एस. डब्ल्यू मांडवे, आरोग्य‎ सहायक एम. एस. बागलाने,‎ आरोग्य सहायक साजिद कादर,‎ आरोग्य सहायक सय्यद जुबेर,‎ वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग‎ यांचा समावेश हाेता. दाेन दिवसांत‎ या पथकांनी १६ हजार ७७२‎ जणांची आरोग्य तपासणी केली.‎ यासाठी तीन झोन तयार केले गेले‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...