आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनसेवा हीच ईश्वर सेवा समजून शहरातील तरुण सुनील कावळे यांनी शहरात आमदार प्रकाश सोळंके व युवा नेते जयसिंग सोळंके यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य जनसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस घेण्यात आलेल्या शिबिराचा सातशेच्या जवळपास नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी घेतली. या शिबिरात शंभराहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.अकरा नागरिकांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येणार आहे तर आयुष्यमान भारत कार्ड ९० नागरिकांचे तर २०० ईश्रम कार्ड नागरिकांचे या शिबिरात काढण्यात आले. तसेच कोविड लसीकरणाचाही नागरिकांनी या शिबिरात लाभ घेतला. नवीन मतदार नोंदणीलाही या शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला्.
३० नागरिकांसाठी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत नागरिकांत चे विमा काढण्यातआले . तसेच रेशन कार्ड संदर्भात अनेक नागरिकांनी या शिबिरामध्ये आपल्या तक्रारी नोंदवल्या. लवकरच या तक्रारींचे निराकरण करून नागरिकांना रेशन कार्डचा लाभ दिला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल नोंदणीही या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दोन दिवस चाललेल्या जनसेवा शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक माधव निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सय्यद शाकेर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, नेत्र चिकित्सक डॉक्टर इनामदार, चंद्रकांत औताडे, गणेश सावंत, ज्येष्ठ पत्रकार काळे, रज्जाक भाई, सुभाष पवार, सुरेश शिंपले, विश्वास शिनगारे, गौतम चव्हाण, शौकत शेख, बाळासाहेब गैबी उपस्थित होते, कार्यक्रमाची प्रस्ताविक आयोजक सुनील कावळे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अक्षय गैबी, अमोल सिरसट, नितीन भोसले, कृष्णा गायकवाड, विपुल शेवते , सुनील शिंदे, महेश खवतोडकर, रोहित फावडे, सातीराम जेधे, ऋतिक सावंत, रुपेश सावंत, बळीराम जेधे, भालेकर, तोडकर, शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.