आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिम:आरोग्य विभागाकडून 18 वर्षे वयापर्यंतच्या मुलांची तपासणी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात राज्यात मोठ्या प्रमाणावर महिलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर आता राज्याच्या आरोग्य विभागाने बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेतला आहे. “जागरूक पालक सुदृढ बालक’ या मोहिमेला राज्यात सुरुवात केली जाणार आहे. २ कोटी ९२ लाख बालकांची आरोग्य तपासणी केली जाईल. दोन महिन्यांत ही तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना राज्य आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागांना दिल्या आहेत.राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नवरात्रीपासून १८ वर्षे वयावरील महिलांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. यातून मोठ्या प्रमाणावर महिलांची आरोग्य तपासणी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...