आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:महा आवास योजनेत उत्कृष्ट काम; बीड झेडपीचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या महा आवास योजनेत बीड जिल्हा परिषदेने उत्कृष्ट काम केले. यामुळे गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शासनाच्या वतीने आवास योजना राबवली जाते. घरकुलांच्या या योजनेत चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यांचा गुरुवारी मुंबईत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेने या महाआवास योजनेत चांगले काम केले होते. या कामाची दखल घेत पुरस्कारासाठी बीड जिल्हा परिषदेची शासनाने निवड केली होती. गुरुवारी झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीना या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला गेला.

बीड जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी हा पुरस्कार स्विकारला. त्यांचे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांी स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...