आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिरिक्त ऊसाची जबाबदारी ही शासनाची आहे. ऊस न गेल्याने शेतकऱ्याने फड पेटवून देत आत्महत्या केली मात्र, एकही सत्ताधारी नेता या कुटुंबाच्या सांत्वनाला आला नाही. हे सरकार दळभद्री असून ही आत्महत्या नसून शासनाने केलेला खून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी भाजपच्या किसान विकास मोच्राचे राज्याचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली. तर, जय भवानी कारखाना हा गेवराई तालुक्याला लागलेला शाप असल्याची टिका आ. लक्ष्मण पवार यांनी केली.
हिंगणगाव येथील मयत शेतकरी नामदेव आसाराम जाधव यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून भाजपा पक्षाच्या वतीने ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, जेष्ठ नेते जेडी शहा, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे, परभणी जिल्हाध्यक्ष विलास बाबर, नगरसेवक याहया खान, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे, परभणीचे जिल्हाध्यक्ष विलास बाबर, उत्तम माने, माऊली शेळके, हनुमान मुळीक, संदीप वाव्हूळे यांची उपस्थिती होती.
पत्रकारांशी बोलताना किसान आघाडीचे वासुदेव काळे यांनी ठाकरे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढाच वाचला. सरकारच्या काळात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर असून, या बाबत ठोस निर्णय घ्या म्हणून सूचना केली. पण, कारखानदारांना पायघड्या घालून, गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ऊस उत्पादक शेतकरीआत्महत्या करतोय याचा अर्थ सरकारचा नाकर्तेपणा आहे. उसाचे गाळप करणारे साखर सम्राट राजकारण करीत आहेत. त्यांनीच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली काढावा. ऊस बांधावर पडला तर या सरकारला त्याची नगदी भरपाई द्यावी लागेल, असे काळे म्हणाले.
मयत शेतकरी जाधव यांना लहान एक मुलगी व मुलगा आहे. या चिमुकल्या मुलांचे प्राथमिक ते उच्चा शिक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जेडी शहा यांनी घेतली आहे. वडलांचे छत्र हरवल्याने या कठीण प्रसंगात आम्ही आपल्या कुटुंबा सोबत आहोत, असा धीर देऊन, जेडी यांनी दोन्ही मुलांचे चांगले शिक्षण करू, असे वचन देऊन मुलांच्या शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.