आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवन:केज शहरातील बालाजी मंदिरात अतिवृष्टी, अनावृष्टी, महामारी, विश्वशांती; बालाजी मंदिरात विष्णू सहस्रनाम पाठ व हवन

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील बालाजी मंदिरात अतिवृष्टी, अनावृष्टी, महामारी, विश्वशांती यासाठी सामुदायिक उपासनाच्या निमित्ताने गुरुवारपासून सामुदायिक विष्णू सहस्रनाम पाठ व हवन कार्यक्रमास सुरुवात झाली. बालाजी मंदिरात गुरुवारी व शुक्रवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सामुदायिक विष्णू सहस्त्रनाम पाठ व सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हवन होणार आहे.

तर शनिवारी सकाळी १० ते १ हवन होणार आहे. कार्यक्रमास श्रीनिवास केजकर, लक्ष्मीकांत देव, भगवानराव केजकर, दामोधर देव, पद्मनाभ देव, भालचंद्र देव, पी. टी. कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, राजीव देशपांडे, डापकर गुरुजी, राजाभाऊ कदम, गुणवंत जोशी, ज्ञानेश्वर लांब, देविदास सुसंगे, प्रभु लांब, शाहु कुलकर्णी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...